दहावीच्या परिक्षेचा ताण कमी करण्यासाठी प्रत्येक पेपरनंतर मिळणार एक दिवसाची सुट्टी

एमपीसी न्यूज –  दहावीच्या परिक्षांना उद्यापासून सुरुवात होणार असून यावेळी विद्यार्थ्यांचा परिक्षांचा ताण कमी करण्यासाठी दहावीच्या प्रत्येक पेपरनंतर एक दिवसाची सुट्टी देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी आज (सोमवारी) पत्रकारपरिषदेत दिली.

दहावीची परीक्षा यंदा 7 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत होणार आहे. यावेळी राज्यभरातून 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच यंदा प्रथमच विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी राज्यमंडळातर्फे दहावीच्या प्रत्येक पेपरनंतर एकदिवासाची सुट्टी देण्यात येणार आहे. तसेच यावेळी कॉपी मुक्तसाठी 250 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच परीक्षक आणि विद्यार्थींना परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाता येणार नाही, असेही मम्हाणे यांनी यावेळी सांगितले.

व्हॉटस् अॅपवर फिरणा-या प्रश्नपत्रिकांवर विश्वास ठेऊ नका


परीक्षांबाबत व्हाट्स अॅपवर मागील काही दिवसामध्ये संदेश फिरत आहे. या सा-या अफवा असून त्यावर विद्यार्थी वर्गाने विश्वास ठेवू नये.  याप्रकरणी  सायबर सेल कडून तपास करण्यात येत आहे. तसेच पावणे अकरा नंतर येणा-या विद्यार्थीच्या नोंदी ठेवण्याचे आदेश शाळांना देण्यात आल्या असल्याचेही मम्हाणे यांनी स्पष्ट केले.


असे आहे दहावीचे वेळापत्रक –

# 7 मार्च – प्रथम भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती इ.)

# 8 मार्च – व्यावसायिक प्रशिक्षण

# 9 मार्च – द्वितीय भाषा – हिंदी, संस्कृत

# 11 मार्च – इंग्रजी

#  14 मार्च – बिजगणित

# 16 मार्च – भूमिती

#  18 मार्च –  विज्ञान भाग – 1

# 20 मार्च- विज्ञान भाग – 2

# 22 मार्च –  इतिहास व राज्यशास्त्र

# 25 मार्च – भूगोल व अर्थशास्त्र

# 27 मार्च-  माहिती संप्रेषण तंत्रज्ञान

# 29 मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा

# 30 मार्च –   द्वितीय वा तृतीय भाषा    
 

# 31 मार्च –  द्वितीय वा तृतीय भाषा

# 1 एप्रिल –  द्वितीय वा तृतीय भाषा (संयुक्त अभ्यासक्रम)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.