लोणावळ्यात रंगली भारतीय व पाश्चात्य फ्युजन संगीताची मैफील

एमपीसी न्यूज – भारतीय व पाश्चात्य संगीताचा अनोखा मिलाफ असलेला फ्युजन संगीत मैफीलेचा कार्यक्रम नुकताच लोणावळ्यातील सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये पार पडला. जर्मनी येथील प्रसिद्ध गिटरवादक व ड्रम्स वादकांची अनोखी जुगलबंदी या निमित्त लोणावळेकरांना अनुभवायला मिळाली.

सिंहगड इन्स्टिट्यूट व श्री सदगुरू संगीत सदन लोणावळा यांच्या वतीने या फ्युजन संगीत मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते.  सिंहगडचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम.एस.गायकवाड, प्राचार्य एन.के.मिश्रा, अॅण्ड. माधवराव भोंडे, डॉ. देसाई, नितिन कल्याण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी डॉ. हिरालाल खंडेलवाल, नितिन कल्याण, सुरेश गायकवाड, प्रियांका कुलकर्णी, नगरसेविका बिंद्रा गणात्रा, शशिकांत गायकवाड, दिनेश राणावत, अॅड. संदीप आगरवाल, कौस्तुभ दामले, डॉ. मनमथ घरोटे आदी उपस्थित होते.

यामध्ये जर्मनी येथील प्रसिद्ध गिटार वादक मॅक्स कॅल्य, मारटिन स्टँडके (ड्रम्स), जॉनथन सेल (बेस गिटार), पंडित संजय गरुड (गायन), संतोष घंटे (हार्मोनियम), मनोज कदम (तबला) यांनी कला सादर केली.

फ्युजन मैफीलीची सुरुवात राग जोग मधील ‘साजन मोरे घर आयो’ ही बंदिश फ्युजन रुपाने सादर करून करण्यात आली. यानंतर सदगुरू संगीत सदनचे प्रमुख मनोज कदम यांनी तबलावादन सादर करत त्यामध्ये डमरू व शंखाच्या आवाजाचे सादरीकरण केले तर संतोष घंटे यांनी हार्मोनियमच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. पंडित संजय गरूड यांनी ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हे रुपक तालातील नाट्यगीत सादर केले. किरवानी रागात सर्व कलाकारांनी फ्यूजन सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. मॅक्स जॉनथम व मार्टीन यांनी सादर केलेल्या पाश्चात्य संगितातील जँज जाम या संगीत प्रकाराला उपस्थितांनी उभे राहून दाद दिली.

कार्यक्रमाचा समारोप  मिले सूर मेरा तुम्हारा ही भैरवी व पंडित भीमसेन जोशी यांच्या जो भजे हरी को सदा, सोही परम पद पावेगा या भजनाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृतिका मनोज कदम यांनी केले तर ध्वनी व्यवस्था कुमार व मनोज हारपुडे यांनी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.