पिंपरीगावातील अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सावाला सुरवात

15 मार्चला भव्य मिरवणूक 


एमपीसी न्यूज – पिंपरीगावातील अखिल शिवजयंती महोत्सवाला तीन मार्चपासून सुरवात झाली आहे. 14  मार्च पर्यंत पिंपरीगावतील विविध ठिकाणी दररोज सायंकाळी सात वाजता व्याख्यान होणार आहेत. तसेच आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रम महोत्सवात होणार आहेत.


शुक्रवारी (दि.3) शिवव्याख्याते मंदार परळीकर यांचे, शनिवारी प्रसाद मोरे आणि रविवारी सौरभ कर्डे यांचे व्याख्यान झाले. तसेच रविवारी चित्रकला, निबंध स्पर्धा देखील घेण्यात आल्या. सोमवारी (दि.6) पिंपरीगावातील माळी आळी येथे सायंकाळी सात वाजता रविंद्र यादव यांचे व्याख्यान होणार आहे. मंगळवारी (दि.7) मिलींद एकबोटे यांचे वाळुंजकर आळीत व्याख्यान होणार आहे. बुधवारी (दि.8) ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांचे टेलिफोन एक्सचेंज जवळ व्याख्यान होणार आहे. गुरुवारी (दि.9) दिगंबर पडवळ यांचे गंगवा चौकात व्याख्यान होणार आहे. 

शुक्रवारी (दि.10) कल्याण काळे महाराज यांचे कापसे आळी येथे व्याख्यान होणार आहे. शनिवारी (दि.11) सकाळी 10 ते 12 या वेळेत बालामनचाळ येथे आरोग्य शिबिर होणार आहे. सायंकाळी शरद पोंक्षे यांचे भैरवनाथ चौकात व्याख्यान होणार आहे. रविवारी (दि.12) सचिन ढोबळे यांचे राजेशाही चौकात व्याख्यान होणार आहे. सोमवार (दि.13) श्रीशिवस्फुर्ती स्मारक येथे ‘महाशिववंदना’ होणार आहे. मंगळवारी (दि.14) पुरुषोत्तम महाराज यांचे तपोवन रोड येथे व्याख्यान होणार आहे.

बुधवारी (दि.15) भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता शगून चौकातून मिरवणुकीला सुरवात होणार आहे. शिवस्फुर्ती स्मारक, भैरवनाथ चौक, पिंपरी मार्गे मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत शिवाजी महाराजांचा आकर्षक सेट, पालखी, हत्ती, घोडे, उंट असणार आहेत. 400 मुला-मुलींचे लेझिमचे पथक, 150 मुला-मुलींचे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, भगवे झेंडे घेऊन स्केटिंग वर मुलांचे थरारक प्रात्यक्षिक, मुला, मुलींचे मल्लखांबाचे, योगसानाचे प्रात्यक्षिक, मुलींचे जिमन्यास्टीकचे प्रात्यक्षिक पथक असणार आहे. 

त्याचबरोबर बँड पथक, वारकरी भजनी मंडळाचे पथक, ढोल ताशांची 4 वेगवेगळी पथके, बंगाली महिलांचे शंखनात वाद्यपथक, केरळी बांधवाचे वाद्यपथक, पंजाबी बांधवांचे भांगडा ढोलपथक, राजस्थानी, सिंधी बांधवांचे वाद्यपथक सहभागी होणार आहे. रात्री नऊ वाजता भैरवनाथ चौकात राजा सिंग यांची मार्गदर्शन सभा होणार आहे.   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.