गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

खोट्या कागदपत्रांच्या आधारे वाहन परवाना काढणा-या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – खोट्या कागदपत्रांच्या आधारे वाहन परवाना काढून पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) फसवणूक करणा-या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी ते नोव्हेंबर 2016 दरम्यान गुलाबनगर, पिरंगुट येथे घडला.

हर्षद गुलाब पवार (वय 23, रा. गुलाबनगर, पिरंगुट, मुळशी) आणि निळकंठ सुर्यकांत राऊत (वय 36, रा. रुपीनगर, तळवडे), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निगडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

हर्षद आणि निळकंठ या दोघांनी जानेवारी ते नोव्हेंबर 2016 दरम्यान खोट्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे खरी असल्याचे दाखवून वेगवेगळ्या बँकेत खाते उघडले. त्या कागदपत्रांच्या आधारे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) वाहन परवाना काढला.

कागदपत्रांची पडताळणी केली असता बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. पी. पवार तपास करत आहेत.

Latest news
Related news