विषारी थायमिट खाऊन विवाहितेची आत्महत्या; पाईट येथील प्रकार
एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील पाईट येथे एका 24 वर्षीय विवाहितेने थायमीट हे विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
मंगल पप्पू गडदे (वय 24, रा. पाईट ता. खेड), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल हिने शनिवारी (दि.4) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरातील थायमिट हे विषारी औषध प्राषण केले. काही वेळात घरातील मंडळींना हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान रविवारी (दि.5) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार सुभाष पवार यांनी दिली.
पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.