हॉटफुट अ‍ॅकॅडमी, हॅपी फिट संघांची विजयी कामगिरी

दुसरी पुणे युवा साखळी फुटबॉल स्पर्धा

एमपीसी न्यूज – हॉटफूट स्पोर्टस् आयोजित दुसर्‍या पुणे युवा साखळी फुटबॉल स्पर्धेत  हॉटफुट अ‍ॅकॅडमी या संघाने 8, 10 व 12 वर्षाखालील गटामध्ये विजय मिळवून तिनही गटात आगेकूच केली.

मुंढवा येथील हॉटफुट एरीना येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेच्या 8 वर्षाखालील मुलांच्या गटात वीर ठाकूरदास व नीव मॅटचा यांनी केलेल्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर हॉट फुट अ‍ॅकॅडमीने स्टेप ओव्हर संघाचा 4-0, असा सहज पराभव केला. शौर्याने केलेल्या दोन गोलांच्या मुळे पुणे युनायटेड फुटबॉल अ‍ॅकॅडमीने फन फिटनेस संघाचा 2-0 असा पराभव केला.

10 वर्षाखालील मुलांच्या गटात हॉटफुट अ‍ॅकॅडमी संघाने स्टेप ओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा 5-0 असा सहज पराभव केला. हॉटफुटकडून शायलन दुवा व आकाश गुप्ता यांनी प्रत्येकी दोन तर, अहान देखणे याने एक गोल केला. जैनील सांगघील याने नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर फन फिटनेस संघाने अरेना स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीचा 1-0 असा सहज पराभव केला.

12 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये अर्थव कासार, जयेश कवालदार व आदित्य पाटील यांनी केलेल्या गोलांमुळे हॉटफुट अ‍ॅकॅडमीने पुणे सॉकर अ‍ॅकॅडमीचा 3-0 असा पराभव केला. फन फिटनेस आणि हॉटफुट अ‍ॅकॅडमी यांच्या संघामधील सामना 2-2 अशा बरोबरीत सुटला. नाझ फुटबॉल अ‍ॅकॅडमी व अरेना स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी यांच्यामधील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.

स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः 8 वर्षाखालील मुलेः

1) हॉट फुट अ‍ॅकॅडमीः 4 (वीर ठाकूरदास 2, नीव मॅटचा 2) वि.वि. स्टेपओव्हरः 0;

2) पुणे युनायटेड फुटबॉल अ‍ॅकॅडमीः 2 (शौर्य ए. 2) वि.वि. फन फिटनेसः 0;

10 वर्षाखालील मुलेः फन फिटनेसः 1 (जैनील सांगघील) वि.वि. अरेना स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीः 0;

2) हॉटफुट अ‍ॅकॅडमीः 5 (शायलन दुवा 2, आकाश गुप्ता 2, अहान देखणे) वि.वि. स्टेपओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमीः 0;

3) अरेना स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीः 2 (यश शिंदे, तन्मय कुमार) वि.वि. नाझ फुटबॉल अ‍ॅकॅडमीः 0;

12 वर्षाखालील मुलेः 1) पुणे फुटबॉल अ‍ॅकॅडमीः 6 (कृष्णा 4, इशान तारनेकर, आर्यन भोसले) वि.वि. आयएनएस युवा अ‍ॅकॅडमीः 1 (अभिषेक वाय.);

2) फन फिटनेसः 2 (यश याज्ञिक, ऑलिव्हर मोझेस) बरोबरी वि. हॉटफुट अ‍ॅकॅडमीः 2 (विशाल अरूण);

3) पुणे फुटबॉल अ‍ॅकॅडमीः 4 (मुर्तझा बुटवाला 2, हृतिक छाजेड, श्‍लोक देशपांडे) वि.वि. नाझ फुटबॉल अ‍ॅकॅडमीः 1 (हर्षल जाधव);

4) नाझ फुटबॉल अ‍ॅकॅडमीः 2 (यश परदेशी , पुर्वा गायकवाड) बरोबरी वि. अरेना स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीः 2 (जोसेफ बॉस्को, ओरीअन मॅथ्युज्);

5) हॉटफुट अ‍ॅकॅडमीः 3 (अर्थव कासार, जयेश कवालदार आदित्य पाटील) वि.वि. पुणे सॉकर अ‍ॅकॅडमीः 0;

14 वर्षाखालीलः हॅपी फिटः 3 (रोहीत नान्नाप्राज 2, कासिफ सय्यद) वि.वि. इंद्रायणी स्पोर्टस क्लबः 1 (साई शरण);

2) हॅपी फिटः 6 (हर्ष पटवा 4, आगम अरोरा, अर्थव निरवाणे) वि.वि. पुणे युनायटेड फुटबॉल अ‍ॅकॅडमीः 1 (सिद भाटीया);

3) केपी इलेव्हनः 2 (रवि राठोड 2) वि.वि. स्टेप ओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमीः 1 (वेदांत मुटेकेकर);

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.