प्रत्येक कार्यक्षेत्रात महिला एक पाऊल पुढे – डॉ. विजया वाड

एमपीसी न्यूज –  आज सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आता पुढे येऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. त्या महिलांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी ही आपण सर्व महिलांनी घेतली पाहिजे. एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले.

स्वानंद महिला संस्था, पिंपरी-चिंचवड व ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन महिला विभाग यांच्या वतीने पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात यंदाचे एकदिवसीय अखिल भारतीय 12 वे स्त्री साहित्य-कला या संमेलनाचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या संमेलसनाची सुरुवात संत तुकाराम महाराज मंदिरापासून सभागृहापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली.

दुपारच्या सत्रात महिलांसाठी जन्मठेप की स्वावलंबन या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.


यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-या स्त्रियांनाही यावेळी गौरविण्यात आले. त्यात उत्कृष्ठ महिला पत्रकार म्हणून एमपीसी न्यूजच्या स्मिता जोशी यांना, तर स्वानंद महिला भूषण पुरस्कार डी.वाय.पाटील विद्या प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, उद्योजिका कमला साबद्रा यांना. तर स्वानंदा कतृत्वदक्ष माता पुरस्कार समाजसेविका रंजना लुणावत, गृहिणी पानकुंवर कटारीया यांना तर स्वानंद कर्तृत्ववान महिला पुरस्कार दुरदर्शनच्या उपसंचालिका रत्ना चॅटर्जी, नगरसेविका मनीषा चोरबोले यांना मिळाला. स्वानंद साहित्य रत्न पुरस्काराने पुणे आकाशवाणीच्या प्रतिमा जगताप यांना गौरविण्यात आले.

यावेळी कवी उद्धव कानडे यांनी अहमदनगर स्नेहालयाच्या पूजा गायकवाड यांची मुलाखत घेतली. त्यानंतर दुर्गेश सोनार, पितांबर लोहार, दीपेश सुराणा यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांनी दाद दिली.

तसेच यावेळी शिक्षण महर्षी कै. शंकरलाल मुथा यांच्या चरित्रावर अधारित सिडीचे प्रकाशन करण्यात आले. त्याबरोबरच स्वर्गीय चंदनलाल दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ संस्था पुरस्कारातील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी पुरस्कार पी.एच. डायग्नोस्टिक सेंटर यांना, भारतरत्न इंदिरा गांधी पुरस्कार पुण्यातील जया आनंद या संस्थेला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार दौंड येथील अविश्री बाल सदन यांना, कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार निगडीतील ज्ञान प्रबोधिनी प्राथमिक विभाग, स्वानंद आदर्श माता पुरस्कार आशा लुकंड यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता राठोड, सागर सांकला, शुभांगी शिंदे यांनी केले. ज्योती गांधी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.