भारुड, अभंग व भक्तीगीतांमध्ये पुण्यात रंगली भजन स्पर्धा

एमपीसी न्यूज – सदा माझे डोळा, जडो तुझे मूर्ती… इंद्रायणी काठी, देवाची आळंदी या भक्तीगीताने निर्माण झालेले मंगलमय वातावरण… कृष्णलीला सांगणारी, बावरले बावरले मी हरी रे ही गवळण… आली आली गं भागाबाई, आली आली गं भागाबाई हे भारुड सादर करणा-या महिलांचा मेळा… अशा भक्तीमय वातावरणात भारुड, अभंग आणि भक्तीगीतांमध्ये महिला भजनी मंडळांची स्पर्धा रंगली.

लायन्स क्लब ऑफ पुणे प्रभाततर्फे महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. बिपीन पाटोळे, सचिव विकास कोलते, अद्वैत महिला भजनी मंडळाचे विनय माडीवाले, अपर्णा माडीवाले, घनशाम खंडेलवाल, संगीता पाटोळे, किरण जाधव, लाला भुरट आदी उपस्थित होते. स्पर्धेत पुणे  शहर व जिल्ह्यातील एकूण 22 महिला भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.

अ‍ॅड. बिपीन पाटोळे म्हणाले, लोकसंस्कृती टिकविण्यासाठी व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. लायन्स क्लबतर्फे अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने अनेक महिला भजनी मंडळांनी भारुड, गवळण, पंचपदी, भक्तीगीते सादर केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.