शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

पुण्यात स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरामध्ये स्वाईन फ्लू या आजाराने डोके वर काढले असून 1 जानेवारीपासून आज अखेर 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी आज 2 रुग्णांचा मृत्यू उपचार घेत असताना झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

मागील काही दिवसापासून पुणे शहरात स्वाईन फ्लू या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याचे पाहावयास मिळत आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्याचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. तसेच 1 जानेवारीपासून आज अखेर एक लाख 52 हजार 866 रुग्णांनी या आजाराची तपासणी केली. तर त्या दरम्यान 1 हजार 469 संशियत आढळल्याने त्यांना टैमी फ्लूच्या गोळ्या देऊन उपचार सुरु करण्यात आले. मागील दोन महिन्याच्या काळात 4 रुग्णांचा स्वाइन फ्लू ने तर आज 2 रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे.

यामुळे शहरातील नागरिकांनी या आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळील रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

spot_img
Latest news
Related news