तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत शाळांमध्ये ‘डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट स्पर्धा’

वराळ्यातील भैरवनाथ विद्यालय प्रथम तर इंदोरीतील  प्रगती विद्यालय द्वितीय

एमपी न्यूज – इंदोरी येथील प्रगती विद्यालयामध्ये तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत शाळा व विद्यालयातील स्पर्धकांची डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती तळेगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक व या स्पर्धेचे मुख्य संयोजक रामदास इंगवले यांनी दिली.  या स्पर्धेत तीन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.   सोमवारी (दि. 6) ही स्पर्धा घेण्यात आली.   


  
कार्यक्रमासाठी प्राचार्य ढमढेरे सर, संस्थेचे पर्यवेक्षक भालेराव, प्रा. पांडुरंग कापरे,लक्ष्मण मखर,साई फ्रेंड सर्कल संस्थेचे अध्यक्ष संजय चव्हाण, चंद्रकांत धनवे, मच्छिंद्र बारवकर, पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर, सचिन काचोळे, विठ्ठल काळे, सुधीर वाडीले, प्रशांत सोरटे,विद्या उगले, प्रसन्न माने, ममता शिरगावकर आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून अंध अपंग संस्थेचे हिरे सर,विद्या काशिद, अर्चना काटे, पाटील सर आदीनी काम पाहिले.  कार्यक्रमासाठी स्पर्धक विद्यार्थी, शिक्षक, परीक्षक यांची अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती.

यामध्ये भैरवनाथ विद्यालय, वराळे यांना प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी प्रगती विद्यालय इंदोरी हे ठरले तर जि प प्राथमिक शाळा नवलाख उंब्रे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. साई फ्रेंड सर्कल इंद्रायणी अंध अनाथ संस्थेचा विद्यार्थी राहूल वाघमारे याला विशेष उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम व द्वितीय क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रशस्तिपत्राने गौरविण्यात आले. तृतीय क्रंमाक विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक इंगवले व त्यांचे सर्व सहकारी, प्रगती विद्यामंदिरचे शिक्षकवृंद यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितोळे सरांनी केले व आभार पोलीस उपनिरीक्षक पासलकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.