भारतीय सेना व पक्षघात बाधित पुनर्वसन केंद्राला बजाज ऑटोचे सहाय्य

झेंडा दिवस निधीच्या माध्यमातून शहिदांच्या विधवा, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – बजाज ऑटोने सेना झेंडा दिवस निधीला (एएफएफडीएफ) एक कोटीची रुपयांची देणगी आणि पुणे स्थित पक्षघात बाधित पुनर्वसन केंद्राला (पीआरसी) रु 31 लाखांचे सहाय्य नुकतेच पुरवले आहे. एएफएफडीएफसाठीचा धनादेश बजाज ऑटोचे सामाजिक बांधिलकी (सीएसआर) सल्लागार सी. पी. त्रिपाठी यांनी एएफएफडीएफ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय मनोहर पर्रीकर यांना नवी दिल्ली येथे सुपूर्द केला.

केंद्रीय संरक्षण मंत्री आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश पातळीवर राज्यपाल/उपराज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यवस्थापन समिती एएफएफडीएफचे कार्य पाहते. भारत सरकारच्या अखत्यारीत केएसबी एएफएफडीएफच्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांकरिता विविध कल्याण व पुनर्वसन योजनांची आखणी व अंमलबजावणी करते. एकूण 32 राज्य सैनिक बोर्ड व 385 जिल्हा सैनिक बोर्ड यांच्या माध्यमातून ही कामे केली जातात. सेना झेंडा दिवस निधीच्या निमित्ताने बजाज ऑटोकडून एक कोटी रुपयांची देणगी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अॅक्टिव्हिटीच्या अंतर्गत देण्यात आली आहे.


पक्षघात बाधित पुनर्वसन केंद्राविषयी

पुण्याजवळच्या खडकी येथील पीआरसीमध्ये राष्ट्राची सेवा करताना मज्जा संस्थेच्या दुखापतीमुळे सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांची देखभाल व पुनर्वसन ही कामे केली जातात. देशातील हे अशा प्रकारचे सर्वात मोठे तर दक्षिण/आग्नेय आशियातील एक अग्रगण्य केंद्र आहे. या केंद्राला बॅटरीवर चालणाऱ्या चाकांच्या खुर्च्या पुरवण्यासाठी देखील सीएसआर अॅव्टिव्हिटी अंतर्गत 31 लाख रुपयांचे सहाय्य देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.