जागतिक महिलादिनानिमित्त पिंपळे सौदागरमध्ये चित्रप्रदर्शन

एमपीसी न्यूज – जागतिक महिलादिनानिमित्त पिंपळे सौदागर येथे बुधवारपासून चित्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यात महिला सशक्तीकरण हा विषय घेण्यात आला असून चित्रकार आपली कला सादर करणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन बुधावारी (दि. 8) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. हे प्रदर्शन 8 ते 22 मार्चपर्यंत सकाळी 10 ते 8 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे, अशी माहिती वर्षा सोनकर यांनी दिली.
या प्रदर्शनात स्नेहील संस्था (डेहराडून), जम्मू काश्मीर सेंटर फॉर क्रिएटिव्ह आर्ट आणि लुतिका आर्ट गॅलरी पिंपळे सौदागर यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या वेळी स्त्री भ्रूणहत्या, वाढता हिंसाचार, स्त्रिचे सामाजिक योगदान, असे विषय घेऊन 30 चित्रकारांनी साकारलेली आपली कला या प्रदर्शनाच्या निमित्ताने रसिकांना पाहायला मिळणार आहे.