पिंपरीत वाहतूक व्यावसायिकाला लुबाडल्याप्रकरणी भोंदूबाबा ताब्यात

एमपीसी न्यूज – पिंपरीमध्ये करणीची भीती दाखवत वाहतूक व्यवसाय करणा-या व्यावसायिकाची लुबाडणूक केल्या प्रकरणी भोंदूबाबाला आज पिंपरी पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.
सुभाष वसंतराव वाकोडे उर्फ राजू पुजारी (वय 44), असे भोंदूबाबाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोंदूबाबाने वाहतूक व्यावसायिकाला त्यांच्या ट्रकचा नंबर पाहून त्यांना व त्यांच्या ट्रकचालकाला धोका आहे. तसेच त्यांच्यावर त्यांच्या शत्रूंनी करणी करून बांधून ठेवले आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायात तुम्हाला यश मिळणार नाही, अशी भीती दाखवत त्यांना स्वतःकडील मंतरलेल्या अंगठ्या घेण्यास सांगितले.
तसेच व्यावसायिकाकडून वेळोवेळी करणीची भीती दाखवत 15 हजार रुपये लुबाडले. तसेच पैशाची मागणी करत आजही (मंगळवारी) त्या भोंदूबाबाने पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात व्यावसायिकाला पैसे घेऊन बोलावले होते. यावेळी पिंपरी पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.
पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.