सहा दुचाकी आणि तीन स्कॉर्पिओंसह सराईत चोरटे गजाआड

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या युनिट तीन ने केलेल्या कारवाईत दोघा सराईत चोरट्यांना जेरबंद करण्यात आले. यावेळी त्यांच्या ताब्यातून 3 स्कॉर्पिओ आणि सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई काल (6 मार्च) करण्यात आली.

हरीभाऊ धर्मराज खेडकर (वय-29, रा. मुंगसेवाडी, ता.पाथर्डी, जी. अहमदनगर) आणि बाबासाहेब उर्फ बाळू एकनाथ केदार (वय-26, रा. वारणी, ता. शिरूर कासार, ज.बीड), असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम मोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. वरील आरोपींनी पुणे परिसरातील वारजेमाळवाडी, चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन स्कॉर्पिओ चोरल्या. अटक केलेल्या आरोपींनी यापूर्वी बीड, सांगली, सातारा येथे एटीएम व बँकेवर दरोडा टाकल्याचे गुन्हे आहेत.

आरोपी हे गाड्या चोरल्यानंतर त्यांची इंजिन व चॅसिस नंबर खोडून बनावटनंबर टाकून त्या गाड्या बीड आरटीओ येथे री-रजिस्ट्रेशन करून विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.