शहरात सर्वत्र महिला दिनाचा उत्साह

एमपीसी न्यूज –  आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहरात सर्वत्र वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत. तसेच यामध्ये आरोग्य शिबिरे, सत्कार यांचा समावेश आहे.

विश्व श्रीराम सेना यांच्या वतीने आरोग्य शिबिर 

महिला दिनानिमित्त विश्व श्रीराम सेना यांच्या वतीने  आकुर्डीतील विठ्ठल मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व महिला सत्कार संभारभ करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका मिनल यादव, नगरसेविका वैशाली काळभोर, डॉ. अभिजित भालशंकर आदी मान्यवरांच्या उपस्थित होते. यामध्ये हिमोग्लोबीन, रक्तदाब मधुमेह ईसीजी नेत्रतपासणी शरीराची चरबी आदी तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात 170 महिलांनी सहलाभ घेतला. सुत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले तसेच आभार अक्रम शेख यांनी केले.

कुदळवाडी येथे महिला दिन उत्साहात साजरा

महिला दिनाचे औचित्य साधून कुदळवाडी येथे आज आमदार महेशदादा लांडगे युवा मंच कुदळवाडी यांच्या वतीने  दिनेश  यादव यांच्या हस्ते कचरा वेचणा-या महिलांचा साड्या देऊन सत्कार करण्यात आला. या महिलांमुळे रस्त्यावर कचरा साफ होतो. या महिलांना रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, खिळे, लोखंडी वस्तू, कागद, पुठ्ठे गोळा करून आपली उपजिवीका भागवावी लागते पण त्याच्या हातून समाजाची नकळत सेवा घडते, याचा विचार करून श्री महेश दादा लांडगे युवा मंच च्या वतीने या दुर्लक्षीत महिलांचा सन्मान करण्याचा मानस आखला व रस्त्यावर कचरा वेचणा-या महिलांचा सन्मान केला यावेळी मंचाचे अध्यक्ष दिनेश यादव, मनोज मोरे, अमित बालघरे,यश जाधव, विशाल उमाप, युवराज ताठे, राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.