मोशीत कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर सवदे मंगळवारी सकाळी मोशी येथून दुचाकीवरुन जात होते. संतनगर चौकातून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कारने त्यांना जोरात धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. एमआयडीसी ठाण्याचे फौजदार एम. आर. निकम तपास करत आहेत.