पुण्यात स्वाईन फ्लूने घेतले तीन दिवसात चार बळी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात स्वाइन फ्लू या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील 67 दिवसात 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून आज (बुधवार) आणखी एकाचा स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. स्वाईन फ्लूने मागील तीन दिवसात 4 रुग्णांचा बळी घेतला आहे.

या 7 रुग्णांपैकी केवळ दोन रुग्ण पुणे शहरातील आहे. तर बाकी सहाजण पुणे शहराबाहेरील असून ते पुण्यात उपचार घेत होते, अशी माहिती आरोग्य विभागकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात स्वाइन फ्लूने यंदाच्या वर्षामध्ये चांगलेच डोके वर काढले आहे. 1 जानेवारीपासून आज अखेर 1 लाख 59 हजार 223 रुग्णांनी या आजाराची तपासणी केली. तर त्या दरम्यान 1 हजार 552 संशियत आढळले. तसेच त्यांना टैमी फ्लूच्या गोळ्या देऊन उपचार सुरु करण्यात आले आहे.

या आजाराने वर्षाच्या सुरुवातीपासून आज अखेर 67 दिवसात 8 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष उपाय योजना करण्यात येत असून या आजाराविषयी कोणतीही लक्षणे आढळ्यास जवळील रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.