शनिवार, डिसेंबर 3, 2022

निवृत्त बालवाडी विभागप्रमुख शुभांगी कुलकर्णी यांचे निधन

एमपीसी न्यूज – इंदोरी येथील सरस्वती विद्यामंदिरच्या निवृत्त बालवाडी विभागप्रमुख शुभांगी वसंत कुलकर्णी (वय 62) यांचे आज (गुरुवारी) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांच्या पती, एक मुलगा, एक मुलगी, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे. शुभांगी कुलकर्णी यांच्या पार्थिवावर दुपारी इंदोरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरस्वती शिक्षण संस्थेच्या इंदोरी येथील सरस्वती विद्यामंदिरच्या बालवाडी विभागात त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा केली. इंदोरी परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. विद्यार्थीप्रिय शिक्षिका अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनामुळे इंदोरी परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

Latest news
Related news