चिंचवड पोस्ट ऑफिसमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील ईस्ट पोस्ट ऑफीसमध्ये युनियन नेटवर्क इंटरनॅशनल (UNI)  आणि फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन (FNPO) या संघटनेच्या वतीने बुधवारी (8 मार्च) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात चिंचवड पूर्व डाकघरच्या के.सी. कुलकर्णी आणि कल्पना म्हसे यांच्या हस्ते कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी संघटनेतर्फे पुणे रिजनल सेक्रेटरी डी.आर.देवकर, NAPE चे अध्यक्ष डी.बी.मराठे, उपाध्यक्ष दिनेश बुरसे, सचिव के.एस.पारखी, डी.के. गोडसे, अक्षय मिंढे, पी.एस.हजारे, अशोक अवघडे, दीपा देवपुरकर, वर्षा जाधव, मीरा जाधव, दिप्ती सबनिस, सारीका  नलावडे, सविता जाधव, सुवर्णा धायगुडे आदी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक सांगडे यांनी तर आभार प्रदर्शन संपत डुंबरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.