भूमकर चौकात वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की; आरोपी अटक

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील कार थांबविण्यास सांगितल्याने चिडलेल्या चालकाने वाहतूक पोलिसाला अपशब्द वापरत धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि.8) दुपारी साडेबाराच्या सुमारास भूमकर चौक येथे घडली.

भास्कर देवदास भट्टाचार्य (वय 44, रा. वाकड), असे अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजलाल भालेराव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तेजलाल भालेराव हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. बुधवारी ते भूमकर चौकातील सिग्नलवर वाहतूक नियंत्रण करत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास भास्कर भट्टाचार्य भरधाव वेगात कार घेऊन जात होता. त्यावेळी भालेराव यांनी त्याला कार थांबविण्यास सांगितले. चिडलेल्या भास्कर भट्टाचार्य याने भालेराव यांना अपशब्द वापरत धक्का-बुक्की केली आणि ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.

हिंजवडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आबनावे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.