शनिवार, डिसेंबर 3, 2022

पिंपरीत महापौरपदासाठी भाजपकडून नितीन काळजे, उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे

राष्ट्रवादीकडून श्याम लांडे, निकिता कदम यांनी भरले अर्ज 


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून नितीन काळजे यांनी तर उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी आज (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपला स्पष्ट बहूमत मिळाले असल्यामुळे या दोघांची निवड निश्चित आहे. तर, राष्ट्रवादीकडून श्याम लांडे आणि निकिता कदम यांनी महापौर, उपमहापौरपदासाठी  अर्ज दाखल केले आहेत. 

महापालिकेचे नवे सभागृह येत्या 14 मार्च रोजी अस्तित्वात येणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम नगर सचिव कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला असून गुरुवारी (9 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. 

महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नितीन काळजे यांनी तर उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सभागृह नेते एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, बाबू नायर आदी उपस्थित होते. 

राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी श्याम लांडे आणि उपमहापौर पदासाठी निकिता कदम यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, सभागृह नेत्या मंगला कदम, डब्बू आसवानी, नगरसेविका वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, उषा वाघेरे आदी उपस्थित होते. 

येत्या 14 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता या दोन्ही पदांसाठी महापालिकेच्या सभागृहात निवडणूक होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. भाजपचे संख्याबळ लक्षात घेता महापौर आणि उपमहापौर पदाचा त्यांचा विजय निश्चित आहे.


"bjp
"a

Latest news
Related news