सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

एमपीसी न्यूजच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब, महापौरपद भोसरीलाच!

एमपीसी न्यूज – ‘बदलत्या राजकीय परिस्थितीत पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भोसरीला?’ या मथळ्याचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने दोन दिवसांपूर्वी दिले होते. त्याप्रमाणे भोसरी विधानसभा मतदारसंघातील चऱ्होलीच्या नितीन काळजे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आणि ‘एमपीसी न्यूज’च्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. 


पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तांतर झाल्यानंतर भाजपचा पहिला महापौर कोण होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते. विविध वृत्तपत्रे आणि माध्यमांनी याबाबत विविध प्रकारची भाकिते केली होती. पण त्यांच्यासाठी अनपेक्षित नाव पुढे आले. 

सत्तारूढ पक्षनेतेपदाच्या पाठोपाठ महापौरपदही भोसरीला मिळण्याची शक्यता वर्तविताना एमपीसी न्यूजने संधी असलेल्या उमेदवारांमध्ये नितीन काळजे यांचे नाव अग्रप्राधान्याने दिले होते. भाजपने त्यांच्या गळ्यात महापौर उमेदवारीची माला टाकल्याने एमपीसी न्यूजचा उमेदवाराच्या नावाबाबतचा अंदाज देखील तंतोतंत खरा ठरला. 

निर्भिड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेमुळे लोकप्रिय ठरलेल्या ‘एमपीसी न्यूज’ला व्हिजिट करा आणि ‘रहा एकदम अपडेट, कधीही कुठेही!’
spot_img
Latest news
Related news