मध्य रेल्वेतर्फे रेल्वे अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून कर्मचार्‍यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या लोणावळा विभागाच्या अंर्तगत येणार्‍या लोणावळा रेल्वे स्थानक व परिसरातील रेल्वे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. एस. आर. तिरकी यांच्या अधिपत्याखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या समवेत वरिष्ठ मंडल चिकित्सा अधिकारी डॉ. रुद्रा मांडवी, सहाय्यक चिकित्सा अधिकारी सुजितकुमार पेगडा यांच्यासह मध्य रेल्वे मुंबई विभाग, भायखळा, कल्याण व लोणावळा आरोग्य विभाग व लाईफलाईन हॉस्पिटल मुंबई यांची 40 जणांच्या वैद्यकीय टिमने लोणावळा रेल्वे स्थानकावर हे जवळपास 300 जणांची तपासणी केली. रेल्वेचे चिप मेडिकल डायरेक्टर शाम सुंदर व असिस्टंट जनरल मॅनेजर ए.के. श्रीवास्तव यांनी रेल्वे अॅम्ब्युलन्सने लोणावळ्यात येत शिबिराला भेट देत पाहणी केली.

शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, मधुमेह, रक्तदाब, नाक, कान, घसा, नेत्र तपासणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.