लोणावळा जी वॉर्ड परिसरात दुषित पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरातील जी वॉर्ड परिसरात मागील महिना भरापासून दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची समस्या गंभीर बनली आहे. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा अन्यथा नगरपरिषदेच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू बोराटी यांनी सांगितले.

बोराटी म्हणाले मागील महिनाभरापासून जी वॉर्डमध्ये ड्रेनेज मिक्स पाणी येत आहे. नळातून येणार्‍या पाण्याचा घाण वास येत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण येत आहे. दुषित पाण्यामुळे शहरात कावीळ व मलेरियाची साथ पसरली आहे. शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही तसेच उघड्या गटारी व घाणीचे साम्राज्य असलेल्या भागात पावडर व जंतुनाशक औषध फवारणी देखील केली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गहन बनला आहे.

याबाबत मुख्याधिकारी यांना महिनाभरापूर्वी लेखी निवेदन देऊन देखील परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही. तातडीने याची दखल घेत दुषित पाणी व अस्वच्छ गटारींचा प्रश्न न सोडविल्यास नगरपरिषदेच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा बोराटी यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.