पीएमपीएलच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव पीएपीएमएल बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी नऊच्या सुमारास जगताप डेअरी चौकातील वाय जंक्शन येथे झाला. याप्रकरणी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 
विजयकुमार विरपक्ष स्वामी (वय 24, रा.थेरगाव, मूळगाव उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपीएमएल चालक रवि संभाजी चव्हाण (वय 30, रा. थेरगाव) याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे…

 

विजयकुमार हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. बावधन येथील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. विजयकुमार शुक्रवारी दुचाकीवरुन कंपनीत जात होता. जगताप डेअरी चौकातून जात असताना पीएमपीएम बस आणि त्याच्या दुचाकीची समोरा-समोर धडक झाली, असे सांगवी पोलिसांनी सांगितले. 
 

विजयकुमार याला उपचारासाठी त्वरीत औंध येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारापुर्वीच त्याला मृत घोषित केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.