गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांना प्रकृती खालावल्याने ससूनमध्ये केले दाखल

इव्हीएम मशीनवर बंदी व फेरनिवडणुकांच्या मागणीसाठी विधान भवनासमोर बेमुदत उपोषणाचा 7 वा दिवस

एमपीसी न्यूज – माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या इव्हीएम मशीनवर बंदी आणण्यासाठी आणि फेरनिवडणुकीच्या मागणीसाठी ते 4 मार्चपासून विधानभवनासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा सातवा दिवस आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी त्यांची तापासणी केली आहे. सर्व काही योग्य असून अधिक खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झालेला असल्यामुळे तात्काळ ईव्हीएम मशीनवर बंदी आणावी. महानगरपालिका निवडणुकीत अनेक संशयास्पद गैरव्यवहार घडले असल्यामुळे ही निवडणूक रद्द करावी आणि नव्याने परत घेण्यात यावी. या प्रमुख मागण्यासह इतरही अनेक मागण्यासाठी त्यांनी उपोषणाचा अवलंब केला आहे.

 

प्रकाश आंबेडकरांचा उपोषण कार्यकर्त्यांना पाठिंबा; भेट घेऊन साधला संवाद


यावेळी बोलताना प्रकाश आबेंडकर म्हणाले की, राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये घोळ झाल्याची माहिती पुढे येत आहे. या लढ्यासाठी सर्व घटकातील व्यक्तीने सहभागी होण्याची गरज असून या उपोषण कार्यकर्त्यांशी सरकारने संवाद साधणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राज्यातील शेतक-यांचे प्रश्न विधान भवनात ज्या प्रकारे विरोधी पक्ष मांडत आहे. त्याचप्रमाणे महापालिका निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम मशिन घोटळयाचा प्रश्न मांडावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
"rameshn

Latest news
Related news