महापौरपदाचे कामकाज करायला मिळाले याचे समाधान मात्र राष्ट्रवादीची सत्ता गेल्याची खंत

पिंपरी-चिंचवडच्या मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांचे मनोगत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या मावळ्त्या महापौर शकुंतला धराडे यांनी आज (गुरुवारी) पद सोडण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मला महापौर म्हणून शहराचे कामकाज पाहता आले. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता गेल्याची खंत मनात राहिली आहे.

शकुंतला धराडे यांनी पिंपरी-चिंचवडच्या महापौर म्हणून 12 सप्टेंबर 2014 ते 12 मार्च 2017 असे अडीच वर्ष कामकाज केले. या अडीच वर्षाचा लेखा जोखा त्यांनी या पत्रकारपरिषदेत मांडला. यामध्ये त्यांनी केलेली कामे, त्यांच्याकाळात शहराचा झालेला सन्मान आदी बाबी त्यांनी सादर केल्या.

यावेळी त्या म्हणाल्या की, मी मुळात सामान्य कुटुंबातून आले आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संधी दिली. त्यामुळे मी शहराची 23 वी  व 6 वी महिला महापौर होण्याचा मान मिळवू शकले. 2000 साली  महिला बचत गटाच्या माध्यमातून मी सामाजिक कार्याच्या क्षेत्रात आले. पुढे आमदार लक्ष्मण जगताप, अजित पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले व मी वेगवेगळ्या पदावर कामे केली. या काळात नगरसेवक, विविध समितींची सदस्य ते महापौर अशी पदावर मला काम करण्याची संधी मला मिळाली, याकामात सहकार्य करणा-या सर्वांची मी मनापासून आभारी आहे मानते, असे मत धराडे यांनी मांडले.

शकुंतला धराडे यांच्या काळात झालेल्या प्रमुख कमांमध्ये शहराला स्वच्छ शहरामध्ये देशात नववा तर राज्यात पहिला क्रमांक मिळाला, स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला, मेट्रो प्रकल्प पिंपरीपर्यंत आला, शहरात संतपीठाची स्थापना करण्यात आली. सांगवी किवळे आणि नाशिक फाटा ते  वाकड या बीआरटीएस मार्गाचे उद्‌घाटन करण्यात आले. ही कामे मार्गी लागली.

तर बोपखेल प्रश्न, रेडझोन, अनधिकृत बांधकामे व शास्ती कर, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, निगडीपर्यंत मेट्रो, दापोडी ते निगडी बीआरटीएस मार्ग ही कामे मात्र रखडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.