महापौरपदासाठी मूळ ओबीसीला डावलल्याने ‘ओबीसी’ संघर्ष समिती आक्रमक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी मूळ ओबीसीला डावलल्याने ओबीसी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. समितीने मूळ ओबीसीला डावल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

पिंपरीतील, महात्मा फुले पुतळ्याजवळ ओबीसी संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी आज (शुक्रवारी) एकत्र येत मूळ ओबीसीला डावल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रताप गुरव, विष्णूपंत निचळ, पी.के.महाजन, अनंदा कुदळे, हनुमंत माळी, महेश भागवत, रमेश सोनवणे, पुंडलिक सैंदाणे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपने कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र सादर करून निवडून आलेल्या नितीन काळजे यांचा महापौरपदासाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे मूळ ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी मूळ ओबीसीच्या उमेदवाराला महापौरपदासाठी डावलल्याचा निषेध केला आहे.

1997 पासून स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना संधी मिळू लागली होती. मात्र, 2002 पासून सर्वच राजकीय पक्षाच्या प्रस्थापितांनी खोटे कुणबी दाखले मिळवून मूळ ओबीसींवर अन्याय सुरू केला आहे. त्यामुळे मूळ ओबीसींचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. यापुढे मूळ ओबीसी रस्त्यावरची लढाई करण्याच्या तयारीत आहेत, असे ओबीसी संघर्ष समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.