शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे उकळून ग्राहकांची फसवणूक करणा-या एकावर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी समरीन शेख (वय-35, रा.सैयदनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली असून मनिष विजय कदम (वय-36, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर, पुणे), असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने फिर्यादी यांच्यासह 60 ग्राहकांना मी मंत्रालयात काम करतो असे सांगत, आयुष फायनान्स, श्रीराम फायनान्स, भाग्यलक्ष्मी फायनान्स अशा विविध फायनान्स कंपन्यात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना कर्ज मंजूर केलेले खोटे पत्र, खोटे अॅग्रीमेंट दाखवून त्यांच्याकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली 3 लाख 47 हजार रुपये घेत फसवणूक केली.

पोलीस उपनिरीक्षक व्हि.ए. पवार अधिक तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news