लंडनमधील रॉयल अॅकेडमीतर्फे तळेगावमधील विशाल खळदे यांना फेलोशिप

एमपीसी न्यूज – भारतातील सीआयआयई आणि लंडनमधील रॉयल अॅकेडमी ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने झियॉन वेस्ट मॅनेजर्स या व्यवस्थापन कंपनीचे मुख्य प्रवर्तक विशाल खळदे यांची लंडनमधील सहभागासाठी निवड करण्यात आली आहे.

 

नाविन्यपूर्ण शोधासाठी विशाल खळदे यांची निवड करण्यात आली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून 15 दिवसांचे व्यावसायिक प्रशिक्षण लंडन येथे केले जात असून त्याचा सर्व आर्थिक भार लंडनस्थित न्यूटन फंड ही संस्था करणार आहे. या फेलोशिपसाठी 15 देशातून 20 जणांची निवड झाली. त्यात विशाल खळदे यांची निवड झाली असून त्यासाठी 5 मार्च रोजी ते लंडनसाठी रवाना झाले आहेत. 

 

झियॉन वेस्ट मॅनेजर्स, वातावरणातील व भूतलावरील विकेंद्रीकरण झालेल्या टाकाऊ कच-याचे योग्य ते नियोजन करून त्यापासून उर्जा स्त्रोत निर्माण करणे याचे नियोजन करते. एनर्जी बिन नावाने विकसित केलेले व त्या नावाने पेटंट घेतलेले प्रॉडक्ट जे सेंद्रिय कच-यापासून उर्जा स्त्रोतांमध्ये रुपांतर करते.

 

उद्योजक विशाल खळदे हे गांधीवादी कै. काकासाहेब खळदे यांचे नाते असून उद्योजक यादवेंद्र खळदे यांचे चिरंजीव आहेत. भारतात पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात तसेच नेपाळमध्येही त्यांचे प्रोजेक्ट कार्यान्वित झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.