शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

अण्णा हजारे यांच्या आवाहनानंतर श्रीजीत यांच्या उपोषणाला स्थगिती!

ईव्हीएम मशीनचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर उचलणार – अण्णा हजारे

एमपीसी न्यूज – नुकत्याच पार पडलेल्या पुणे महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत आमरण उपोषणास बसलेल्या श्रीजित रमेशन, बाळासाहेब बोडके व इतरांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बेमुदत उपोषण स्थगित केले आहे. हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर उचलणार असल्याचा व्हिडिओ संदेश अण्णा हजारे यांनी रमेशन यांना पाठविला आहे.

यावेळी अॅड. भास्करराव आव्हाड, अॅड. वंदना चव्हाण व अॅड.आय्युब पठाण उपस्थित होते.

अण्णा हजारे यांनी ईव्हीएम मशीन विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला असून यासाठी राष्ट्रीय पातळीवर जनआंदोलन उभे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी श्रीजित रमेशन यांच्या नावाने दिलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.

येत्या 16, 17 व 18 एप्रिल रोजी अण्णा हजारे हे दिल्ली येथे भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य-आयुक्तांची बैठक घेणार आहेत. यासंदर्भात पुढील निर्णय नाही झाल्यास राष्ट्रीय पातळीवर जनआंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीजित रमेशन यांची तब्येत खालावली असल्याची माहीती  मिळताच त्यांनी हा विषय देशपातळीवर घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे, अशी माहिती श्रीजित रमेशन यांनी दिली.

""

spot_img
Latest news
Related news