एक गाव एक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजय पाताडे

एमपीसी न्यूज –  नेहरुनगर, विठ्ठलनगर, उदयमनगर या  भागात  ‘एक  गाव,  ‘एक शिवजयंती’ उत्सवानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाची नेहरुनगर येथे बैठक आयोजित करण्यात आली  होती. या बैठकीत  ‘एक गाव, ‘एक शिवजयंती’ उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजय पाताडे यांची निवड करण्यात आली.

 

निवड कार्यकारिणी पुढील  प्रमाणे –  मुनाफ तरासगार (कार्याध्यक्ष), शरद उघडे  व  किरण पवार, नवनाथ कांबळे व नितीन  समगीर (सचिव), सचिन शिंदे, सुशील शिंदे  (सहसचिव), दत्तात्रय तळेकर (खजिनदार), बबलू सय्यद व प्रकाश जाधव (सहखजिनदार), सौरभ सगर, चंद्रशेखर कणसे (संघटक), शरद हुले व निळकंठ तागतोडे  (मुख्य मार्गदर्शक) यांचा समावेश आहे. तर मल्लिकार्जुन लच्छान, अनिल सावंत, अमोल मोडक,  सुहास पालांडे  यांचा समितीत तर सुरेखा हुले,  उषा शिंदे,  अक्षता पाताडे, दत्तात्रय यादव यांची सांस्कृतिक समितीमध्ये निवड करण्यात आली.

 

या  बैठकीत मंगळवार 14 मार्चला शिवश्री  श्रीमंत  कोकाटे  यांचे  ‘शिवचरित्र’  या विषयावर व्याख्यान  आयोजित  केले  आहे.  तर बुधवार 15 मार्चला  शिवज्योत आगमन, शिवज्योत फेरी, शिवप्रतिमेचे पूजन, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, शिवप्रतिमेची  मिरवणूक काढण्यात  येणार असल्याची  माहिती  अध्यक्ष अजय पाताडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.