गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

ऑल इंडिया अँटी करप्शनच्या जनरल सेक्रेटरीपदी मकरंद कलबुर्गी

एमपीसी न्यूज – ऑल इंडिया अँटी करप्शन, क्राईम प्रिव्हेंटिव्ह अॅण्ड ह्युमन राईटस् कमिटीच्या पुणे शहर जनरल सेक्रेटरीपदी मकरंद कलबुर्गी यांची निवड करण्यात आली.

 

संघटनेचे प्रदेश अध्यक्ष महेंद्र कडू यांच्या हस्ते कलबुर्गी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटील, निलेश निकम, पुणे शहराध्यक्ष आशुतोष धोडमिसे, सचिन फोलाने, अभिजीत म्हसवडे, संतोष वरक आदी उपस्थित होते.

 

मकरंद कलबुर्गी हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असून लोकांशी निगडीत विविध अडचणी त्यांनी हाताळल्या आहेत. लोकशाही ग्रुपचे सेक्रेटरी आणि सूर्योदय फाऊंडेशनचे उपाध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. याशिवाय विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांशी त्यांचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे आता अँटी करप्शन संघटनेच्या माध्यमातून ते नागरिकांना मदतीचा हात देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest news
Related news