पुणे-लोणावळा लोकलचे चाळीसाव्या वर्षात पदार्पण

एमपीसी न्यूज – पुणे ते लोणावळा या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांची ह्रदयवाहिनी असलेल्या लोकलने आज चाळीसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त आज सकाळी चिंचवड रेल्वे स्थानकावर चिंचवड प्रवासी संघातर्फे दहावीच्या परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थींनींनी दीपाली वीटकळ, निकीता भालेकर, आकांक्षा पेद्दी, शिवानी शिंदे, यासीन शेख, पौर्णिमा सलवादे यांच्या हस्ते केक कापून युनिट लोकलचे चालक ए.के. चौधरी, आर.बी.गौतम यांना केक भरवून लोकलचा वाढदिवस साजरा केला.

 

यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, उपाध्यक्ष मुकेश चुडासामा नंदू भोगले, ईसाक शेख, नारायण भोसले, इक्बाल सय्यद या संघाच्या पदाधिकार्‍यांनी चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख मॅथ्यू जॉर्ज, रामजी दास, सुभाष भागवत या रेल्वे कर्मचार्‍यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार म्हणाले जेष्ठ उद्योजक ईश्‍वरदास चोरडीया यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1989 साली चिंचवड प्रवासी संघाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी उपोषण, आंदोलन, पत्रव्यवहार, सह्यांची मोहीम आदी मार्गाचा अवलंब केल्यानंतर चिंचवडला काही एक्सप्रेस गाड्यांचा थांबा, आरक्षण केंद्र आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.

 

त्यावेळी 1989 साली शहराची लोकसंख्या 6 लाख होती. आज 22 लाख लोकसंख्या झाली आहे. तळेगाव, हिंजवडी, तळवडे, चाकण, पिंपरी-चिंचवड शहरात विविध उद्योग व्यवसाय सुरु झाले. सन 1989 सालापासून पुणे लोणावळा मार्गावर 64 कि.मी. अंतरासाठी चौपदरी रेल्वे मार्ग करा. लोकल वाढ करावी. आजच्या 12 डब्यांऐवजी 15 डब्यांची लोकल सुरू करावी आदी मागण्या सातत्याने चिंचवड प्रवासी संघाप्रमाणेच इतर सर्व प्रवासी संघटनाही करीत आहेत.

 

चिंचवड प्रवासी संघाला मध्य रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या लेखी उत्तरात 1989 साली देखील निधी नाही. नवीन लोकल मिळाली तर तातडीने जादा लोकल सुरु होईल. केवळ आश्वासने देऊन आजही 2017 साली मध्यरेल्वेचे, अधिकारी म्हणतात. रेल्वे बोर्डाकडून अतिरिक्त  लोकल मिळाली तर लोकलच्या फेर्‍या वाढवू असे केवळ आश्वासन दिले जाते. दररोज 90 हजार प्रवाशांची चढ-उतार होते. त्यांची फसवणकू केली जात आहे. आज 44 फेर्‍या लोकलच्या होतात. काही वेळा एक ते दीड तास लोकलच नाही शहरात एकीकडे बेस्ट सिटीचा नारा केला जातो. परंतू वाहतुकीच्या समस्यांबाबत उदासीनता जाणवते.

 

पुणे विभागाला तीन डिझेल मल्टीपल युनिट लोकल मिळाल्या. मात्र, एकही लोकल अद्याप सुरू झालेली नाही. या लोकल गेली दोन महिने धुळ खात पडल्या आहेत. दौंड-पुणे, पुणे-सातारा मार्गावर डेमो लोकलची चाचणी घेण्यात आली त्या तातडीने सुरु करण्यात याव्यात. लोणावळा-दौंड लोकल सुरू करण्यात यावी. यासाठी चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, निगडी, तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा येथील महाविद्यालयांची पत्र, विद्यार्थ्यांच्या सह्या, इतर प्रवाशांची, कामगारांची सह्या व कंपन्यांची पत्र मोहीम चालवून रेल्वे प्रशासनाविरुद्ध जनहित याचिका प्रसंगी दाखल करू, असा इशारा देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.