गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्ल्यूचा आणखी एक बळी

पंधरा दिवसांत चार जणांचा मृत्यू 


एमपीसी न्यूज – चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात स्वाइन फ्ल्यूने एका 35 वर्षीय इसमाचा आज (रविवारी) पहाटे मृत्यू झाला. गेल्या 15 दिवसात स्वाइन फ्ल्यूने चार बळी घेतले आहेत. 

रहाटणी येथील एका 35 वर्षीय इसमाला शुक्रवारी (दि.10) चिंचवड येथील एका खासगी  रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.  त्यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

शहरात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या 15 दिवसांत स्वाइन फ्ल्यूने चार जणांचा मृत्यू झाला आहे.  रविवारी (दि.5) भोसरी येथील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्ल्यूने एका 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. पिंपळे गुरव येथील 50 वर्षीय महिलेचा बुधवारी (दि.1)  चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. 28 फेब्रुवारीला एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून  वातावरणात बदल होत आहे. दिवसभर कडक उन आणि सांयकाळी थंडी पडत आहे. बदलत्या वातावरणामुळे स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन, वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.
Latest news
Related news