पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होळी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी) होळी पोर्णिमेचा सन  मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. 


च-होली, मोशी, चिखली, पिंपरी, चिंचवड, सांगवी, पिंपळे-सौदागर, वाकड, थेरगाव, आकुर्डी, निगडी तसेच पुण्यातील विविध सोसाट्यांमध्ये मोठ्या होळ्या पेटविण्यात आल्या होत्या. होळीभोवती मुले फेर धरुन, टिमक्या वाजवीत असल्याचे दृष्य दिसत होते. महिलांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीचे पूजन केले.

भारतीय परंपरेनुसार गौ-या पेटवून होळी सन साजरा करण्याची प्रथा आहे. होळीच्या दिवशी वाईट गोष्टी जाळल्या जातात. गौ-या, लाकडे, झाडे टाकून होळी पेटविली जाते. शहर व परिसरात गल्लीबोळात, चौकाचौकांत सकाळपासूनच होळीची तयारी करण्यात येत होती. लहान मुलांचा उत्साह दिसत होता. 

शहरातील चौकाचौकात रचलेल्या गोवर्‍या, मध्यभागी उभा केलेला ऊस, एरंडाच्या डहाळीला बांधण्यात आलेले खोबर्‍याच्या वाट्याचे तोरण, होळीची पूजा असे उत्साही वातावरण रविवारी शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळत होते. लाकडे खरेदीसाठी वखारीत गर्दी होत होती.  घरे आणि बंगल्यासमोर घरगुती स्वरुपाच्या होळ्या पेटल्या होत्या. सोसाट्यातील नागरिकांनी एकत्र येत पारंपारिक पद्धतीने होळीचा सन साजरा केला. 

दरम्यान, यंदा होळी पेटविण्यासाठी लागणा-या गौ-या प्रथमच ऑनलाईन विक्रीसाठीही उपलब्ध होत्या. तसेच  पर्यावरणाचा -हास होऊ नये यासाठी अनेकांनी झाड जाळण्याती प्रथा बंद केली आहे. 

यंदाच्या वर्षी नैसर्गिक रंगही मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. नागरिकांनी इको फ्रेंडली पद्धतीने आणि  पाण्याची नासाडी टाळून हा सण साजरा करावा, असे आवाहन ‘एमपीसी न्यूज’ करत आहे.  
"holi
"holi
"holi
"holi
"holi
"holi"

 
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.