गुगल डुडलही रंगले रंगपंचमीच्या रंगात

एमपीसी न्यूज – आज संपूर्ण देशभरात रंगपंचमी उत्साहात साजरी केली जात आहे. यामध्ये गुगल डुडलही रंगून निघालेले पाहायला मिळत आहे.

या सणानिमित्ताने गुगलनेही खास डुडल तयार केले आहे. तसेच गुगल सर्चवर जाताच गुगलवर रंगांची उधळण करणा-या लहानग्यांच्या कंपूचा व्हिडिओही गुगलने तयार केला आहे. त्यातून ते सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देत आहेत.

भारतीय संस्कृतीतील विविध सण आता परदेशातही साजरे होत आहेत, तर याला होळी आणि रंगपंचमी तरी अपवाद कसे राहतील. त्यामुळे गुगल डुडलवरही रंगांची उधळण केली जात आहे.

 

"google0"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.