शहरपरिसरात रंगांची उधळण करत धुळवडीचा उत्साह

एमपीसी न्यूज –  होळी नंतर खरी मजा असते ती धुळवडीची, या दिवशी अगदी अबालवृद्धही रंगाची उधळण करत धुळवड साजरी करतात. त्या प्रमाणे यंदाही महिला, पुरुष, अबालवद्ध सा-यांनीच एकमेकांना रंग लावत धुळवड  साजरी केली.

आजच्या दिवशी राग, जुने वाद विसरुन, सारे एकत्र येऊन  धुळवड साजरी करतात. ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत..ओळख नसलेल्या व्यक्तीही एकमेकांना  रंग लावून अगदी आपुलकीने कोणताही तिढा मनात न ठेवता रंग खेळतात. आजही शहरपरिसारत महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, गल्लीतील मित्र-मैत्रीण, गृहीणी अशा सा-यांनीच मिळून आज रंग लावत धुळवड साजरी केली.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील चौका-चौकात पोलीस तैनात आहेत. नागरिकांनी शांततेत धुलीवंदन साजरे करण्याचे आवाहन, पोलिसांनी केले आहे. 

 

एरवी आपल्या चेह-याबाबत किंवा मेकअप यांचा विचार करणारा महिला वर्गही आज बेभान होऊन रंग खेळताना पाहायला मिळत आहे. होळी नंतर थंडी गावाच्या वेशीबाहेर जाते ती संक्रातीलाच परत येते असे प्रथेनुसार बोलले जाते. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने धुळवड साजरी केली जाते. महाराष्ट्रतही काही ठिकाणी आज होळीची राख ही अंगाला लावून धुळवड साजरी केली जाते.

रंगांची उधळण करत सर्वांनी निरोगी व सुरक्षित होळी साजरी करा, मागील दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना सर्वांनीच केला आहे, त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून कोरडी होळी साजरी करा.  सर्वांना या धुळवडीच्या एमपीसी न्यूजतर्फे रंगभर शुभेच्छा…

 

"holi0"

 

"holi01"

 

"holi000"

 

"holi02"

 

"holi04"

 

"holi03"

 

"holi05"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.