गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

शाहूनगरमध्ये फायबरच्या बसस्थानकाला आग

एमपीसी न्यूज – शाहूनगर येथील फायबरच्या बसस्थानकाला आज (सोमवारी) सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची झळ दोन मोटारीला बसली असून मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चिंचवड, शाहूनगर येथील बहिरवाडे मैदानाच्या बाजूला फायबरचे स्थानक आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास या बस स्थानकाला अचानक आग लागली. बाजूलाच वाळलेले गवत आणि झाडे असल्यामुळे आग भडकली. बाजूला पार्क केलेल्या दोन मोटारीला आगीची झळ बसल्याने मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. 

 

संत तुकारामनगर आणि प्राधिकरणातील बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अर्धा तासाच्या प्रयत्नात आग आटोक्यात आणली.

Latest news
Related news