प्रभागाचा कायापालट करुन दाखविणार; नगरसेवक पंकज भालेकर

एमपीसी न्यूज – गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठने काम करत आलो. जनसंपर्क वाढविला. तरुणांचे संघटन करत रोजगार उपलब्ध करुन दिला. काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती पाहून महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने संधी दिली. शहरात भाजपची लाट असतानाही राष्ट्रवादीचा संपूर्ण पॅनेल निवडून आला असून आम्ही चारही नगरसेवक एकत्र काम करत  प्रभागाचा कायापालट करणार असल्याचे, नवनिर्वाचित नगरसेवक पंकज भालेकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले. 


पंकज भालेकर प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, त्रिवेणीनगर, म्हेत्रेवस्ती प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. भालेकर बी.ई (सिव्हील इंजिनिअर) पर्यंत शिकलेले आहेत.  

घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. चुलते गावचे माजी सरपंच होते. तर, आजोबांचे वारकरी संप्रदायात नाव होते. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शहर उपाध्यक्षपदावर काम केले. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदार संघाचा राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष झालो. 

युवक संघटनेत काम करत असताना युवकांचे संघटन केले. लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळून पाहिल्या. झोकून देऊन पक्षाच्या उमेदावासाठी काम केले. निवडणुकीचा अनुभव पाठिशी होता. तो अनुभव निवडणुकीत कामाला आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, युवकांचे आपल्या विजयात मोठे योगदान, असल्याचे पंकज भालेकर यांनी सांगितले. 

दोन वर्षापूर्वी पक्षाने ‘फ’ प्रभागावर स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याच्या माध्यमातून तळवडेत रस्ता केला. तळवडे येथे अग्निशामक केंद्र उभे केले. नागरिकांच्या विविध समस्यांसाठी आंदोलने छेडली. काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती पाहून आणि काम पाहून पक्षाने  महापालिका निवडणुकीसाठी आपणावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली. नागरिकांनी राष्ट्रवादीच्या पॅनेलवर विश्वास दाखवून चारही उमेदवार निवडून दिले.

गेल्या 10 वर्षात प्रभागात काहीच विकास झाला नाही. प्रभागाचा काही भाग रोड झोनच्या हद्दीमध्ये येत आहे. मात्र, त्याच्यावर मात करत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर प्रभागाचा विकास करणार आहे. आम्ही बोलणार नसून विकास करुन दाखविणार आहोत. क्रीडांगण, भाजी मंडई, अद्यावत स्मशानभूमी, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. लघुउद्योजकांचे विविध प्रश्न असून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महापालिकेच्या कल्याणकारी योजना प्रभाविपणे राबविणार असल्याचे, पंकज भालेकर यांनी सांगितले.

आम्ही चारही उमेदवार एकाच पक्षाचे आहोत. तीघे नवीन आहोत. तर, एक जण अनुभवी आहेत. शहरात भाजपची लाट असताना प्रभागातील नागरिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवांरावर विश्वास ठाकून पॅनेलला निवडून दिले आहे. आम्ही चारही उमेदवार पाच वर्षात एकत्रितपणे काम करुन प्रभागाचा कायापालट करण्याचा संकल्प केल्याचे, पंकज भालेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.