शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

नगरसेवक झालो तरी नेहमी कार्यकर्ता म्हणूनच काम करेन – हर्षल ढोरे

एमपीसी न्यूज –  मी नगरसेवक झालो असलो तरी मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी एक सहकारी व नागरिकांसाठी एक प्रमाणीक कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहीन, अशी भावना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर एमपीसी न्यूजशी बोलताना हर्षल ढोरे यांनी व्यक्त केली.

हर्षल ढोरे यांनी महापालिकांच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 32 मधून निवडणूक लढवली व ते भरघोस मतांनी निवडून आले. त्यांच्या या नगरसेवक पदाच्या  यशाबद्दल बोलताना म्हणाले की, मी शाळेत 7 वी ते 12 वी असा पाच वर्ष सलग वर्गाचा प्रमुख होतो. त्यामुळे तेव्हा पासूनच नेतृत्वगुण होते. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर  मी  2003 पासूनच समाजकारणात उतरलो. तेव्हा राजकारणात यावे असे वाटले नव्हते. पण वाढता जनसंपर्क, काम करण्याची आवड याने मी 2003 ते 2012 असे सांगवीत विविध उपक्रम करत राहीलो.

त्यानंतर 2012 साली मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यावेळी मी केवळ 71 मतांनी पराभूत झालो. तेव्हा पासूनच मी  2017 च्या निवडणुकीच्या तयारीला लागलो. माझे कुटुंबीय, आमदार लक्ष्मण जगताप यांचे सहकार्य व मार्गदर्शनामुळे यावेळी यश मिळाले. तरीही मी माझ्या सांगवीकरांसाठी  नगरसेवक न राहता त्यांचा कार्यकर्ता हर्षल म्हणून काम करत राहीन. कारण मला माझ्या बदललेल्या सांगवीला पुन्हा जुनी शांत, हसत-खेळत राहणारी सांगवी करायचे आहे. थोडक्यात मला सांगीवीला सांगवीपण द्यायचे आहे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वैयक्तीक आवडी निवडीबद्दल बोलताना ढोरे म्हणाले की, मला क्रिकेट खेळायला खूप आवडतो. मी महाविद्यालयात असताना महाराष्ट्रासाठी 16 वर्षीय गटाच्या टीममध्ये क्रिकेट खेळलो आहे. मात्र 2002 सालापासून मी समाजकारणाकडे वळलो व माझा खेळ सुटला. याची खंत वाटते पण मला समाजात सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरायलाही  आता आवडायला लागले आहे. त्यामुऴे तेवढ्याच आवडीने मी  समाजासाठी काम करणार आहे.

spot_img
Latest news
Related news