दिवेआगार समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील तरुणाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील तरुणाचा दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (13 मार्च) घडली.

गौरव जगदीश तोरगे (32 रा. सिंहगड रोड पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे.

गौरव हा मित्रांसोबत दिवेआगर येथील  समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेला होता. समुद्रात राईडला गेल्यानंतर परत येत असताना उतरताना अंदाज न आल्यामुळे पाण्यात पडलेल्या गौरवचा बुडून मृत्यु झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.