पिंपरीच्या उपमहापौरपदी भाजपच्या शैलजा मोरे बिनविरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी शैलजा मोरे यांची आज(मंगळवारी) बिनविरोध निवड झाली. निकिता कदम यांनी माघार घेतल्यामुळे पिठासीन अधिकारी दौलत देसाई यांनी मोरे यांच्या निवडीच्या अधिकृत घोषणा केली.   

शैलजा मोरे 24 व्या उपमहापौर ठरल्या आहेत. प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत.

 

 

नवनिर्वाचित उपमहापौर शैलजा मोरे यांचा परिचय –

 

शैलजा मोरे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या महादजी शिंदे आणि माधवराव शिंदे, विजयाराजे शिंदे (सिंदिया) या राजघराण्याचे सरदार म्हणून जोडलेल्या परांडे (गायकवाड) घराण्याच्या वंशज आहेत.  त्यांच्या या विजयाचे ग्वाल्हेरमध्ये ठिकठिकाणी फलक लावून स्वागत केले जात आहे.

1981 मध्ये शैलजा मोरे यांचा अमरावतीचे अविनाश मोरे यांच्याशी विवाह झाला. नोकरीच्या निमित्ताने मोरे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले. अविनाश मोरे एसकेएफ कंपनीतून नुकतेच निवृत्त झाले आहेत. तर शैलजा मोरे यांचे चिरंजीव अनुप भाजपचे कार्यकर्ते व राज्य माथाडी कामगार मंडळाचे सल्लागार या पदावर तसेच प्रदेश भाजप युवा मोर्चाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.

 

"more0"

 

"kalje

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.