हडपसरमध्ये संपत्तीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – संपत्तीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना हडपसर येथून उघडकीस आली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी विठ्ठल गायकवाड (वय-50, रा.रामटेकडी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली असून अविनाश मोहन गायकवाड (वय-26, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,  आरोपी अविनाश हा फिर्यादीचा पुतण्या आहे. त्यांच्यामध्ये वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद आहेत. या वादातूनच काल (13 मार्च) रोजी आरोपीने मला घरातील हिस्सा का देत नाही असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यात आणि हातावर कु-हाडीचे वार करत त्यांना ठार मारण्याच्या प्रयत्न केला.

पोलीस उप निरीक्षक ए.बी.माळी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.