वारजेत सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासरी होत असलेल्या छळास कंटाळून एका वीस वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह अन्य दोघांवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही दुर्दैवी घटना काल (13 मार्च) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

कोमल प्रवीण लोंढे (वय-20, रा. श्रीराम चौक, रामनगर,वारजे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मयत विवाहितेची आई कविता शेलार यांनी फिर्याद दिली असून विवाहितेचा पती प्रवीण लोंढे याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मयत  विवाहितेचे लग्न 2015 मध्ये झाले होते. ती सासरी नांदत असताना पती, सासू, नणंद यांनी आपसात संगनमत करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून तिने अखेर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उप निरीक्षक धुमाळ अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.