शाळेच्या संचालिका ते नगरसेविका – सुनिता तापकीर

एमपीसी न्यूज  – घरात पहिल्यापासूनच राजकीय पार्श्वभूमी आहे. राजकारण काय असतं ते घरातल्या थोर मंडळीकडून समजत गेलं व पाहात आले.  त्यामुळे प्रभागाचा विकास करायचा हे एकच ध्येय मनांत ठेवले आहे. अशा भावना नवनिर्वाचित नगरसेवक सुनिता तापकीर यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या.


सुनिता तापकीर यांचे वडील शंकरराव निम्हण हे पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापौर होते. तर सासरे बाबासाहेब तापकीर हे संत तुकारामनगर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून  भरपूर शिकायला मिळाले.

तसेच त्यांचे पती हेमंत तापकीर हे केंद्रीय श्रम रोजगार मंत्रालयाचे माजी अध्यक्ष आहेत. तर धीर हरेश  तापकीर हे युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. मुलगा राज तापकीर हा चिंचवड विधानसभा युवा अध्यक्ष आहे.  त्यामुळे राजकीय वातावरणात वावरले असले तरी मनांत थोडीफार भिती असतेच.

सुनिता तापकीर यांचे बेबीज् इंग्लिश मिडियम स्कूल काळेवाडीमध्ये आहे. त्या शाळेच्या संचालिका असल्यामुळे जनसंपर्कात वाढलेल्या आहेत.

प्रभागाच्या विकासासाबद्दल काळेवाडी, रहाटणी परिसराचा चेहरामोहरा बदललणार आहोत. आरक्षणे विकसित करायची. मूलभूत सुविधांना प्राधान्य, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, स्मार्ट सिटी, मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणार, मोबाईल अॅप, टवाळखोर मुलांवर आळा, कचरा प्रश्न आदी प्रश्न प्राधान्याने सोडविणार आहे. महिलांसाठी लघुउद्योग सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त महिलांना यातून रोजगार कसा मिळेल याकडे लक्ष देणार. लोकांचा विश्वास कामांतून निर्माण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.