रावेत नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज – पवना नदीपात्रात रावेत येथे एका अनोळखी इसमाचा  मृतदेह आज (बुधवारी) सकाळी सापडला.

पवना नदीपात्रत रावेत जवळ एक मृतदेह पडल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. नागरिकांनी याबाबत सकाळी साडेदहाच्या सुमारास देहूरोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मृतदेह सापडल्याचे वय अंदाचे 45 असून उंची पाच फूट आहे. मध्यम बांधा, अंगामध्ये बरमुडा, काळ्या-तापकिरी रंगाची बनियन परिधान केलेली आहे. उजव्या हातात पितळी कडे, लाल दोरा, केस कापलेले आहेत, अशा वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास वाकड, पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

ओळखपटेपर्यंत मृतदेह शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. मृत व्यक्ती कामगार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.