शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पाच दिवसांपूर्वी भरधाव मोटारीने जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील गंभीर जखमी झालेल्या सहप्रवासी महिलेचा सोमवारी (दि.13) उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.9) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोशी-आळंदी रोडवर देहूफाटा येथे घडली होती. 


सरस्वती जयराम कोरडे (वय 41, रा. मरकळ रोड, आळंदी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, दुचाकीस्वार राजु बापु आयनोर (वय 38, रा. आळंदी) हे किरकोळ जखमी झाले आहेत. 

राजु आणि सरस्वती एकमेकांच्या ओळखीचे होते. गुरुवारी ते दोघे दुचाकीवरुन मोशी येथून जात होते. सरस्वती या पाठीमागे बसल्या होत्या. देहूफाटा येथून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने त्यांना जोरात धडक दिली, असे पोलिसांनी सांगितले. 

यामध्ये सरस्वती या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपाचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी (दि.13) त्यांचा मृत्यू झाला. 

अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. दिघी ठाण्याचे फौजदार एस. एन. आहेर तपास करत आहेत.
spot_img
Latest news
Related news