धुळे येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा काळ्या फिती लावून निषेध

एमपीसी न्यूज – धुळे येथील शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेल्या मारहाणीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयातील डॉक्टरांनी आज (बुधवारी) काळ्या फिती लावून काम करत निषेध व्यक्त केला. 
धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची  तोडफोड केली होती. याचा विविध स्तरातून निषेध केला जात आहे. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम करत निषेध व्यक्त केला. यामध्ये नर्स संघटना देखील सहभागी झाल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.