सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नाकारले महापालिकेचे वाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे  नवनिर्वाचीत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पदभार स्विकारताच महापालिकेचे वाहन वापरणार नसल्याचे आज (बुधवारी) जाहीर केले.


यावेळी बोलताना पवार म्हणाले की, माझ्याकडे स्वतःची गाडी आहे, त्यामुळे मी माझ्या खाजगी गाडीचा वापर करणार आहे. एका गाडीवर जर दीड-दोन लाख  रुपयांचा महापालिकेचा खर्च होत असेल तर त्याची बचत व्हावी व तो महापालिकेच्या इतर कामांसाठी वापराला जावा म्हणून मी महापालिकेचे वाहन नाकारले आहे. तसेच  पक्षातर्फे एक सकारात्म संदेश जनतेत जाणे गरजेचे आहे. कारण जनतेने जो विश्वास ठेवला आहे तो आम्हाला सार्थ करायचा आहे.

यावेळी पत्रकारांनी इतर पदाधिका-यांची या निर्णयाने कोंडी होणार नाही का असे विचारले असता पवार म्हणाले की, हा माझा वैयक्तीक निर्णय आहे. याचे कोणावर बंधन नाही. मात्र या  सकारात्मक निर्णयाचे इतरही नेते अनुरकरण करतील याची मला खात्री आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मानधन का नाकारले नाही असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की नगरसेवकांच्या मानधनापेक्षा  खाजगी मदतनिसाचे वेतन जास्त असते. आम्हाला केवळ 7 हजार वेतन मिळणार आहे, असे म्हणत त्यांनी याबाबत स्पष्ट  उत्तर देणे टाळले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.